आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शारीरिक हालचालींकडे कायम बारीक लक्ष ठेवा. या हालचालीच तुमची तब्येत कशी आहे हे सांगतात. तसेच आयुष्य किती बाकी आहे, हेदेखील त्यावरुन समजते, असे ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष मांडला आहे. मध्यवयीन तब्बल सव्वाचार लाख लोकांवर हे संशोधन करण्यात आले आहे.
अशी ओळखा शरीरीक स्थिती
१) कुठलीही वस्तू हातात धरल्यानंतर ती व्यवस्थित घट्ट पकडता येते का ? कि निसटते ? त्यावर पकड निट बसत नाही ? अशा पद्धतीने प्रथम हाताची ग्रिप तपासा.
२) हालचाली थोड्या स्लो तर झालेल्या नाहीत ना ? उठणे, बसणे, चालणे, वेगवेगळ्या हालचाली करणे, या गोष्टी पहिल्यापेक्षा स्लो तर करीत नाही आहात ना ? यावरून हालचाली तपासा.
३) ही दोन्ही लक्षणे दिसत असतील, तर तुमचे आयुष्य उताराला लागले आहे असे समजावे.
४) अशी लक्षणे आढळल्यास हृदयाचे विकारही होऊ शकतात. या गोष्टींकडे त्वरित लक्ष दिल्यास, उपचार केल्यास पुढची हानी टाळता येते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)