• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

दिवाळीत खाद्यपदार्थांमधील भेसळ घरच्याघरी अशी तपासा, जाणून घ्या पद्धत

by Nagesh Suryawanshi
October 27, 2019
in Food
0
sweets
0
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवाळीत मिठाईसाठी लागत असलेल्या पदार्थांची विक्री सर्वाधिक होत असल्याने नफेखोर व्यापारी मोठ्या प्रमाणात या पदार्थांमध्ये भेसळ करतात. यामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याने हा धोका टाळणे खुप गरजेचे असते. भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी यातील भेसळ घरच्याघरी कशी तपासावी याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत.

अशी आळखा भेसळ
खाद्य तेल
खाद्य तेलात खनिज तेल मिश्रीत केले जाते. परीक्षा नळीत तेलाचा नमुना घ्या व त्यात पोटॅशिअम हायड्रॉक्साइड मिसळा. मिश्रण विरघळले तर तेल शुद्ध समजा. मिश्रणाचे दोन थर तयार झाले तर भेसळ आहे.

तूप
तूपातील कोल्टारडीजची भेसळ ओळखण्यासाठी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टाकावे. जर पदार्थाचा रंग गुलाबी झाला, तर भेसळ आहे, असे समजावे.

रबडी
यात टिपकागदाची भेसळ केली जाते. हे ओळखण्यासाठी रबडीच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका, त्यात थोडे पाणी मिसळा व काच नळीने मिश्रण ढवळा. नळीवर तंतू जमा झाले तर कागदाची भेसळ आहे.

चांदीचा वर्ख
मिठाईवर चांदीच्या वर्खाच्या नावाने अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल वापरले जाते. हे ओळखण्यासाठी चांदीचा अर्क जाळा. खरा चांदीचा अर्क जाळल्यास तो लहानशा बॉल प्रमाणे दिसेल तर अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल करडा रंगाचे होईल. तसेच वर्खाचा नमुना कोमट पाण्यात टाका. त्यात डायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाका. मिश्रणात हायड्रोजनचे बुडबुडे आले तर भेसळ आहे.

पिठीसाखर
यामध्ये खाण्याचा व धुण्याचा सोडा मिसळला जातो. पिठीसाखरेच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाकल्यानंतर फेस आल्यास भेसळ आहे. साखरेत खडूच्या भुकटीची भेसळ असते. पेलाभर पाण्यात एक चमचा साखर टाका. साखर थेट तळाला गेली तर शुध्द आहे.

मिठाई रंग
मिठाईला आकर्षक व फ्रेश कलर देण्यासाठी मेटॅनिल यलो हा कृत्रिम रंग वापरला जातो. हे ओळखण्यासाठी मिठाईच्या तुकड्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका. मिठाईला जांभळा रंग आल्यास कृत्रिम रंग आहे. तसेच मिठाई हातात घेतल्यानंतर हाताला जर रंग लागत असेल तर भेसळ आहे. मेटॅनिल यलो आणि टारट्रांजाइन यावर बंदी आहे.

खवा
खव्यामध्ये स्टार्च मिसळले जाते. हे ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडासा खवा घ्या व त्यात पाणी मिसळा. ते थोडे गरम करा. खवा गार झाल्यावर त्यात पाच थेंब आयोडिन टाका. जर खव्याचा रंग जांभळा झाला तर त्यात स्टार्च आहे.

दूध
दुधात खडू पावडर, साबण पावडर, हायड्रोजन पेरॉक्साइड, यूरिया व पाणी मिसळले जाते. हे ओळखण्यासाठी समान आणि स्वच्छ भागावर दुधाचे थेंब टाका. भेसळयुक्त दूध सगळीकडे पसरते तर शुद्ध दूध सरळ रेषेत वाहते. दूध काही काळानंतर पिवळे पडले तर भेसळ आहे. दुधाचे काही थेंब बोटावर घेऊन घासल्यास फेस आला तर भेसळ आहे. दुधाचे नमुने परीक्षानळीत घ्या व त्यात सोयाबिनची पावडर घाला, नळी हलवून त्यात रेड लिटमस पेपर टाका. दुधात युरिया असेल तर पेपर निळा होतो. दूध पावडरमध्येही कोल्टारडीजची भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टाका. जर पदार्थाचा रंग गुलाबी झाला, तर भेसळ आहे.

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBodydiwaliFoodhealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाखाद्यपदार्थदिवाळीभेसळशरीरसेहतस्वास्थ्य
fast brain
Food

‘वेगवान’ मेंदू हवाय तर दररोज दुधात ‘या’ बिया मिसळून प्या, जाणून घ्या

November 3, 2020
banana
माझं आराेग्य

रोज खा एक केळे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, ‘हे’ आहेत १० फायदे

September 12, 2019
‘या’ ८ भाज्या खुंटलेली उंची वाढवण्यासाठी अतिशय लाभदायक, जाणून घ्या
Food

‘या’ ८ भाज्या खुंटलेली उंची वाढवण्यासाठी अतिशय लाभदायक, जाणून घ्या

July 16, 2019
tb-patient
ताज्या घडामाेडी

सावधान ! पुण्यात टीबीच्या (एक्सडीआर) रूग्णांची संख्या वाढतेय

June 8, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

2 hours ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

3 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

7 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.