आरोग्यनामा ऑनलाईन- कोविड-19 महामारीमुळे प्रत्येकाची दिनचर्या बदलली(changes ) आहे, परंतु आता सर्व लोक आपल्या जीवनाची गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, यामध्ये काही लोक असे सुद्धा आहेत जे घर आणि काम यामध्ये आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशावेळी आरोग्याशिवाय काहीही शक्य नाही., विशेषकरून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आणखी गरजेचे आहे. येथे काही अशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्या माध्यमातून महिलांना आपले)(changes ) मन आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होईल.
हे लक्षात ठेवा
1. योग्य पाणी आणि झोप :
योग्य प्रमाणात पाणी प्या आणि किमान 8 तास चांगली झोप जरूरी आहे.
2. योग आणि ध्यान :
किमान 30 मिनिटे ध्यान आणि योग करा, यामुळे दिवसभर उर्जा स्तर वाढलेला राहू शकतो.
3. स्क्रीन टाइम कमी करा :
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यावरील वेळ कमी करा. मोबाईलशिवाय राहाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
4. शरीराची स्थिती :
सध्या महिलांना स्लिप्ड डिस्क आणि सर्वायकल स्पॉडिलोसिसची समस्या जास्त होत आहे. यासाठी जास्तवेळ चुकीच्या पद्धतीने बसणे टाळा. व्यायाम करा.
5. आहार :
जेवणात फायबर, प्रोटीन युक्त खाद्य पदार्थ आणि योग्य प्रमाणात तरल पदार्थांचा समावेश करा.
6. मासिक पाळीतील स्वच्छता :
गुप्तांगाची स्वच्छता दररोज राखली पाहिजे. परंतु मासिक पाळी दरम्यान योग्य स्वछता बाळगा. 4 ते 5 तासाने सॅनिटरी नॅपकिन बदलत राहा.
7. साखरेचे सेवन कमी करा :
साखरेचे सेवन कमी करा. त्याऐवजी गुळाचे सेवन करा. यामुळे हार्मोन नियंत्रित राहण्यास मदत होते. डायबिटीज, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
8. उन्हात काही वेळ थांबा :
शरीराला कॅल्शियम मिळण्यासाठी सकाळीच्या उन्हात 15 ते 20 मिनिटे थांबा.
9. स्वत:साठी वेळ काढा :
स्वत:च्या साठी वेळ काढून या वेळेत एखादा छंद जोपासा.
10. वाईट सवयी सोडा :
सिगरेट, अल्कोहलयुक्त पेय घेण्याची सवय सोडून द्या.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.