आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वातावरणातील बदल, तसेच प्रदूषण आणि वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम मानवाच्या त्वचेवर होत आहे. त्वचेचा कर्करोग हा त्याचा एक भीषण चेहरा आहे. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांच्यामध्ये हा आजार लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ‘अ’ कमी होऊ देऊ नका. त्वचेचा कर्करोग होऊ नये म्हणून तुम्ही खालील टिप्स फॉलो करा.
त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी काय कराल-
१) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत सुर्यप्रकाशात फिरणे टाळा.
२) पावसाळ्यात देखील चांगल्या दर्जाचे व एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लोशन लावा.
३) सुर्यप्रकाशात फिरताना चांगल्या दर्जाचे सनग्लासेस,एसपीएफ १५ असेलले लीपबाम, टोपी आणि फुल स्लीव्हज असलेले अंग पुर्ण झाकणारे कपडे यांचा वापर करा.
४) तुमच्या शरीरावर अनावश्यक तीळ अथवा इतर कोणतीही लक्षणे आढळतात का याची प्रत्येक महिन्याला तपासणी करा. वर्षातून एकदा हेल्थ केअर सेंटर्स मधून नियमित संपुर्ण शरीराचे स्कीन चेकअप करुन घ्या.