सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वातावरणात बदल झाल्यावर, अ‍ॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो. मात्र तुम्हांला सतत सर्दीचा त्रास होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. सतत सर्दी होणं हे एका गंभीर आजाराचं लक्षण आहे. सर्दी होणं, नाक बंद राहणं, डोकं जड होणं, नाकातून सतत पाणी वाहणं ही लक्षण सामान्य वाटतात. परंतु ही लक्षणे आढळल्यास ‘सायनोसायटीस’ चा देखील धोका असू  शकतो.
१) सतत सर्दी होत असेल तर नियमित ८-१० ग्लास पाणी पिण्याची सवय असायलाच पाहिजे. सकाळी गरम चहा किंवा पाणी प्या. यामुळे तुम्हाला सर्दी होणार नाही.

२) अनेकांना स्विमिंग करायला खूप आवडत पण ज्या व्यक्तींना कायम सर्दी होते. त्यांनी स्विमिंग करणे टाळावे. आणि स्वीमिंग करायची असेल तर पाण्यात क्लोरिनचा वापर करावा.

३) बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

४) सर्दी झाल्यावर नाक मीठ पाण्याने स्वच्छ करा. जेणेकरून तुम्हाला सर्दी होणार नाही.

 ५) वायुप्रदुषणापासून दूर रहा. कारण यामुळे सर्दी होते. घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या.

६) घरामध्ये बिछाने, उशी, पायपुसणी स्वच्छ ठेवा. जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही. आणि तुम्हाला सर्दी होणार नाही.

७) अनेकांना परफ्युम मारायची सवय असते. पण ज्यांना सतत सर्दी होत असेल त्यांनी परफ्युमपासून दूरच रहा.