आरोग्यानामा ऑनलाइन – स्वच्छतेसाठी वापरली जाणारी कीटकनाशके आणि इतर केमिकल्स लहान मुलांचे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. फिनाईल, हारपिक, लायझोल आणि अन्य उत्पादनांमुळे लहान मुलांमधील गट मायक्रोब्सवर म्हणजेच मानवी पचन तंत्रात राहणार्या सूक्ष्म जीवांवर प्रभाव पडतो. याने लहान मुलांचे वजन वाढू शकते, असे कॅनडातील अल्ब्रेटा यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
मुलांचे वजन वाढण्याची कारणे
1 अभ्यासाचा वाढता ताण, अभ्यासामुळे जेवण न करणे, इतर काही खाऊन पोट भरणे.
2 खेळणे किंवा शारीरिक व्यायामाचा अभाव.
3 आई-वडील दोघे दिवसभर ऑफिसला जाणारे असणे.
4 जास्त टीव्ही बघणे.
5 ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळणे.
6 जंकफूडचे अधिक सेवन करणे.
7 जेवण केल्यानंतर बसून राहणे.