आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कान हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग असून कानाचा पडदा हा तर अतिशय नाजूक असतो. चुकूनही यावर आघात झाल्यास बहिरेपणा येण्याची शक्यता असते. आपण दिवसभरात काही अशा चूका करत असतो, ज्याचा वाईट परिणाम आपल्या कानावर होत असतो. बहिरेपणा कोणत्या कारणांमुळे येऊ शकतो, याची माहिती आपण घेणार आहोत.
ट्यूमर
न्यूरोमा, पॅरागँग्लियोमा आणि मॅनिंजियोगासारख्या ट्यूमरमुळे अनेक वेळा कानांना ऐकू येणे बंद होते.
वृद्धावस्था
वृद्धावस्थेमुळे कानांच्या नव्र्स डॅमेज होतात. अशावेळी बहिरेपणा येऊ शकतो.
कानातील मळ
जमा झालेला मळ कानात दिर्घकाळ राहिल्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशावेळी बहिरेपणा येऊ शकतो.
डायबिटीज
डायबिटीजमुळे न्यूरोपॅथीची समस्या झाल्याने बहिरेपणा येऊ शकतो.
ईयरफोन
रोज ३-४ तास ईयरफोनमध्ये मोठ्या आवाजात म्यूझिक ऐकल्यास कानाचे नुकसान होऊ शकते. यामुळे बहिरे होण्याची वेळ येऊ शकते.
इन्फेक्शन
कानांची योग्य प्रकारे देखरेख न केल्यामुळे कानांमध्ये इन्फेक्शन होते. यामुळे ऐकू येणे बंद होते.
तीव्र आवाज
१२५ डेसीबलच्या वर लाउड स्पीकर सतत ऐकल्याने कानांचे पडदे डॅमेज होतात. यामुळे बहिरे होण्याची समस्या होऊ शकते.