आरोग्यनामा ऑनलाईन टीम – देशात अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण डायबेटिसने ग्रस्त आहेत. डायबेटिस हा बदललेल्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांपैकी एक आहे. जाणून घ्या डायबेटिज होण्याची कारणे व प्रकार –
डायबेटिस म्हणजे काय
उपाशीपोटी आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी रक्तातील शुगर चेक केली जाते. उपाशीपोटी (फास्टिंग शुगर) १२६ च्या वर असेल तसेच खाल्ल्यानंतर (पीपी शुगर) २००च्या वर असेल तर त्या व्यक्तीस डायबेटीस असतो.
डायबेटिजमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढते.
डायबेटिज झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.
डायबेटिसची कारणे –
-डायबेटिज हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो.
-डायबेटिज होण्याला काही अंशी अनुवांशिकताही जबाबरदार आहे. आई, वडील किंवा कुटुंबातील सदस्यांना डायबेटिज असेल तर मुलांना होण्याची शक्यता जास्त असते.
-बदललेली जीवन व जेवण पद्धती. जेवणात फायबर असलेल्या पदार्थांचा अभाव.
-चूकीच्या जीवनशैलीमुळे , स्थूलपणामुळे
-दारू किंवा धूम्रपानाचे व्यसन.
-मानसिक व शारीरिक ताणतणाव
डायबेटिसचे प्रकार –
डायबेटिजचे, टाइप-१ आणि टाइप-२ असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात शरीरात इन्सुलीन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते. टाइप-२ मध्ये शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहते. डायबेटिस असलेल्यांपैकी ९५ टक्के रुग्णांना टाइप-२ने ग्रासलेले असते. युवा पिढीतही डायबेटिज वेगाने वाढत आहे. चूकीच्या जीवनशैलीमुळे अनेक युवक टाइप टू डायबेटिजचे बळी ठरत आहेत.
स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा
रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी
दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार