आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ब्लॅडरच्या वॉल टिश्यूज इंफॅक्टेड होऊन तेथे रक्ताच्या गाठी तयार होणे ही ब्लॅडर कॅन्सरची सुरुवात असते. ब्लॅडर आपल्या यूरिनरी सिस्टमचा एक भाग असतो जो किडनीकडून येत असलेल्या यूरिनला कलेक्ट करतो. यूरिन येथूनच शरीराच्या बाहेर निघते. ही समस्या ६० वर्षावरील पुरुषांमध्ये जास्त दिसून येते. याची लक्षणे वेळीच ओळखल्यास त्यावर उपचार करणे शक्त असते.
ही आहेत याची लक्षणे
लघवीद्वारे सफेद टिश्यूज
लघवीद्वारे सफेद टिश्यूज किंवा सफेद डिस्चार्ज होणे.
यूरिन इन्फेक्शन
वारंवार यूरिन इन्फेशनचा त्रास होणे.
पोटदुखी
नेहमी पोटाच्या खालच्या भागात दुखणे.
हाडांचे दुखणे
सतत हाडांचे दुखणे.
लघवीतून रक्त
लघवीद्वारे रक्त येत असेल तर हे ब्लॅडर कॅन्सर लक्षण असू शकते.
वजन कमी होणे
कारण नसताना वजन घटणे हे या आजाराचे लक्षण असू शकते.
कंबरदुखी
सतत कंबर दुखीचा त्रास होणे.
थकवा
सतत थकवा, अशक्त वाटणे.
यांना असतो धोका
१) जास्त धुम्रपान करणारे.
२) जास्त मद्यपान करणारे.
३) वय ६० वर्षापेक्षा जास्त असणारे.
४) वजन जास्त असणारे.