आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या लोकांच्या जीवशैलीत व्यापक बदल झाला आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर सुद्धा प्रतिकुल परिणाम होता आहे. चुकीची दिनचर्या, रात्री उशीरापर्यंत जागरण करणे, अयोग्य खाणे-पिणे आणि तणावामुळे अनेक आजार जन्म घेतात. सोबतच धूम्रपान, दारू आणि जंकफूड सुद्धा आजारांचे प्रमुख कारण आहेत. याचा पचन क्रियेवर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या होते. यामुळे डोकेदुखी, गॅस, भूख न लागणे इत्यादी आजार होतात. अशावेळी जवळच्या डॉक्टरांशी अगोदर संपर्क साधा. सोबतच एरंडेल तेलाचा वापर करू शकता. यामुळे बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळू शकतो. तुम्हाला सुद्धा हा त्रास असेल तर हे घरगुती उपाय जाणून घेवूयात.
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
रिसर्च गेटमध्ये प्रसिद्ध एका संशोधनात एरंडेल तेलाचे फायदे सांगण्यात आले आहेत. हे संशोधन तुर्कीमध्ये करण्यात आले आहे. या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, एरंडेल तेल बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी करण्यात उपयोगी ठरू शकते. मात्र, या विषयावर संशोधनाची आवश्यकता आहे. याशिवाय, एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध एका संशोधनात सुद्धा एरंडेल तेल बद्धकोष्ठतेवरील औषध असल्याचे सांगण्यात आले आहे.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
एरंडेल तेल आणि दूध
जर तुम्ही बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल आणि यापासून आराम हवा असेल तर एरंडेल तेल सेवन करू शकता. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे एरंडेल तेल मिसळून सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या लवकरच संपेल. सोबतच पचनक्रिया सुद्धा मजबूत होते. तुम्ही सकाळी सुद्धा एरंडेल तेल आणि दूध सेवन करू शकता.
चेहर्यावर Wax केल्यानंतर चूकुन देखील ‘हे’ काम करू नका, स्किन होईल खराब; जाणून घ्या
Hair Care Tips : रूटीनमध्ये ‘हे’ 8 बदल करा, आपोआप लांब होतील केस; जाणून घ्या
Skin Care : मासिक पाळी दरम्यान चेहर्यावर फोडं आले तर ‘ही’ गोष्ट करा, जाणून घ्या