आरोग्यनामा ऑनलाइन टीम : काजूला ड्रायफ्रुट्समध्ये सर्वाधिक चवदार घटक मानले जाते. शरीरासाठी काजू लाभदायक असून याच्या नियमित सेवनाने विविध फायदे होतात. काजू खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. तसेच विविध आजार दूर राहतात. काजूचे काही खास उपाय आणि फायदे असून त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
* काजूमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात. याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात. दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच हृदयविकारावरही काजू रामबाण औषण सिद्ध झाले आहे. काजूमध्ये अँटी ऑक्सिडेंट असल्याने वजन संतुलित राहते.
* काजू उर्जेचा उत्तम स्रोत असून त्याच्या सेवनाने शरीराला शक्ती मिळते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकते. काही वेळा कष्ट न करता थकवा जाणवतो, अशावेळी २-३ काजू खावेत. यामुळे मूड चांगला राहतो. काजू खाल्ल्याने थकवा दूर होते.
* काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा निरोगी, सुंदर होते. काजू खूप महाग असले तरी वेगवेगळी औषधे घेण्यापेक्षा काजूचे सेवन करावे.
* काजूमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. काजू लवकर पचतात. यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास नियमित काजू खावेत.
* काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळते. काजू तेलकट, शुष्क इत्यादी प्रत्येक प्रकरच्या त्वचेसाठी लाभदायक आहे.
* त्वचा तेलकट असल्यास काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवावेत. सकाळी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किवा थोडे दही मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.