आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डोळे हे अतिशय महत्वाचे इंद्रिय आहे. म्हणूनच डोळ्यांची नियमित काळजी घेतली पाहिजे. सध्या संगणक आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. डोळ्यांचे विविध विकार सुद्धा वाढले आहेत. कमी वयातच डोळ्यांच्या गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या समस्या दूर ठेवायच्या असल्यास आहारात काणत्या पदार्थांचा समावेश करावा, याविषयी जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ अ, क आणि ई जीवनसत्त्वांचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. रेटीनावर वाढत्या वयाचा प्रभाव पडत नाही.
२ रात्री पाण्यात किंवा दुधात बदाम भिजवून ते सकाळी खावेत.
३ फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. यातील कॅरोटीन तसेच व्हिटॅमिन्समुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते.
४ नियमित अक्रोडचे सेवन करावे. यातील ई जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड्समुळे डोळ्यांच्या पेशी मजबूत होतात.
५ वेलची दुधात टाकून प्यायल्याने दृष्टी चांगली राहते. तसेच डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांची शक्ती कायम राहते.
Visit : arogyanama.com