आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्मार्टफोन (Smartphone), लॅपटॉप आदि गॅझेट्सचा वापर अलिकडे प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तासनतास एकाच स्थितीत बसून ही गॅझेट्स वापरली जातात. स्मार्टफोन (Smartphone) वापराताना बोटं, मनगट, खांदे या अवयवांवर परिणाम होतो. बोटं, मनगट आणि खांद्यामध्ये दु:खणे, मांसपेशी, हाडांमध्ये दुखणे, सुजणे इत्यादी त्रास होऊ शकतो. या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास गाठींचा रोग होण्याची शक्यता वाढते. स्मार्टफोनचा अतिवापर हा सायलेंट किलर आहे. शरीरावर याचा खूप वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे.
हे आहेत गंभीर परिणाम
1) मान सतत खाली झुकवून ठेवल्याने सर्वाइकल स्पाइनवर वाईट परिणाम होतो. डोक्याचा भार मानेवर पडतो. यामुळे दुखण्याचा त्रास होतो.
2) अंधारात स्मार्टफोन सतत वापरल्यास दृष्टीदोषही निर्माण होऊ शकतात.
3) सांध्यांमध्ये लिगामेंट आणि टेंडनमध्ये सुज येते. यामुळे रिपिटेटिव्ह स्ट्रेस इंज्युरी होऊ शकते.
ट्रांजिएट स्मार्टफोन ब्लाइंडनेस
अंधारात सतत स्मार्टफोन वापरल्याने दोन महिलांमध्ये ट्रांजिएट स्मार्टफोन ब्लाइंडनेस हा आजार आढळून आला आहे. अंधारात सतत स्मार्टफोन वापरल्याने या महिला 15 मिनिटापर्यंत एका डोळ्याने अंध होत होत्या, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
Dengue symptoms | Dengue virus | डेंग्यू म्हणजे काय? लक्षणे कोणती? उपचार जाणून घ्या
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे