आरोग्यनामा ऑनलाईन टीम – किडनी ट्रांसप्लांटनंतर सुरुवातीचे तीन महिने जास्त काळजी घ्यावी लागते. इंफेक्शन झाल्यास लगेच अँटिबायोटिक औषध दिले जाते. कोणतेही ट्रांसप्लांट तेव्हाच यशस्वी मानले जाते जेव्हा शरीर नवीन अवयव आणि त्याची कार्यप्रणाली स्वीकारते. या प्रक्रियेनंतर व्यक्तीला आराम वाटतो. परंतु या काळात दुर्लक्ष झाल्यास विविध समस्या होऊ शकतात. याकाळात कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते, आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेवूयात.
ही काळजी घेतात
१) रुग्णाला व्हायरल, फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि सर्दी-पडसे यासारख्या छोट्या-छोट्या आजारांमध्येही सावध राहणे आवश्यक आहे. यामुळे औषधी आणि पथ्य याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.
२) एखाद्या प्रकारची जखम, युरिनरी ट्रॅक संक्रमण लक्षात आले किंवा श्वसनाशी संबंधित संक्रमण दिसून आले तर डॉक्टरांना सांगावे. पथ्य पाळावेत.
३) ट्रांसप्लांटनंतर रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग वाढण्याची शक्यता वाढते. यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले औषध नियमित घ्यावे, पथ्य पाळावेत.
४) आहारामध्ये जास्त प्रमाणात हलके, वसा रहित, कमी मीठ असलेले जेवण घ्यावे. दररोज ८-१० ग्लास पाणी अवश्य प्यावे. पालक, कोथिंबीर, बटाटे, रताळे खाऊ नये. मांसाहार करू नये. फळभाज्या धुवून खाव्यात. शिळे अन्न खाऊ नये.
अशी ठेवा किडनी निरोगी
१) मधुमेह, बॅक्टेरियल आणि व्हायरल संक्रमण, टॉन्सिल, अल्कोहलचा वापर, धूम्रपान करणे, ड्रग्स घेणे, यामुळे किडनीचे नुकसान होते, यापासून दूर राहावे.
ही आहेत लक्षणे
* युरिनमध्ये ब्लड येणे
* युरीन कमी किंवा जास्त होणे
* पाय, तळवे आणि टाच सुजणे
* थकवा जाणवणे, झोप न लागणे
* मळमळ होणे