आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही पदार्थ अणि पेय दीर्घ काळापर्यंत घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम त्वचा आणि दातांवर पडू शकतात. असे पदार्थ योग्य प्रमाणातच सेवन केले पाहिजेत. अथवा सेवन करणे टाळावे. गरज भासल्यास डॉक्टरांकडे जावून सल्ला घ्यावा.
हे लक्षात ठेवा
* कॅफीनच्या अतिसेवनामुळे जास्त लघवी होते. शरीराला पाणीदेखील कमी मिळते. यामुळे त्वचा तजेलदार दिसत नाही. ती शुष्क आणि कोरडी वाटू लागते. निस्तेज त्वचेमुळे व्यक्ती वयस्क वाटू लागते.
* गरजेपेक्षा जास्त शुगर घेतल्यास सेल्स शुगर मॉलिक्यूल्सला प्रोटीनमध्ये मिसळते. यामुळे अडव्हान्स ग्लायकेशन अँड प्रोडक्टसची निर्मिती होते. हा घटक त्वचेतील कोलोजन नष्ट करतो. यामुळे त्वचा सैल होते. जास्त साखरेमुळे दातांवर किटाणू वाढतात. दात पिवळे दिसतात.
* एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूस हे पदार्थ तत्काळ ऊर्जा देतात, परंतु यात अॅसिसडचे प्रमाण जास्त असते. यासाठी जास्त ज्यूस पिणे टाळावे. नैसर्गिक साखर बॅक्टेरिया शोषून घेतात आणि उर्वरित साखरेचे रूपांतर अॅसिडमध्ये होते. यामुळे दातांची समस्या होते.
* जास्त मीठयुक्त पदार्थ म्हणजेच चिप्स, स्नॅक्स सेवन केल्यास त्वचेवर विपरीत परिणाम होतो. फ्लूड रिटेंशनमुळे त्वचेला सूज येते.
* लॅमोनेड पेय दातांसाठी योग्य नाही. यामध्ये साखर आणि सायट्रस दोन्ही असतात. हे जास्त प्रमाणात पिल्याने प्लाक तयार होते. यामुळे दातांवर डाग पडतात. शिवाय दात तुटण्याची शक्यता सुद्धा असते.