आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शिमला मिर्ची (कॅप्सीकम) ही मुळ रुपाने दक्षिणी अमेरिकेची भाजी आहे. ३ हजार वर्षांपासून तिथे शिमला मिर्चीची शेती केली जाते. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा शिमला मिर्चीची बी घेऊन आले होते. शिमलामध्ये तेथील पर्वतावरील माती आणि तेथिल वातावरणाचे अनुकूल पाहून त्यांनी त्या ठिकाणी शिमला मिर्चीच्या बियांचे रोपण केले. शिमला मिर्चीची शेती शिमलामध्ये होते. या कारणामुळे याचे नाव शिमला मिर्ची पडले आहे. सुरुवातीला शिमला मिर्ची ही फक्त हिरव्या रंगाची होती. आता ही मिर्ची लाल आणि पिवळ्या रंगामध्ये देखील उपलब्ध आहे.
शिमला मिर्चीचे फायदे –
लाल आणि पिवळ्या रंगाची मिर्ची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सीडेंट जास्त प्रमाणात असतात. यामुळे तुम्ही तणावापासून वाचता. तसेच शरीरात रक्तभिसरण चांगल्याप्रकारे होते. जेवढ्या भाज्या कलरफुल असतात त्यामध्ये अँटीऑक्सीडेंट जास्त प्रमाणात असतात.
शिमला मिर्चीमध्ये व्हीटॅमिन ए, व्हीटॅमिन सी, आणि व्हीटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात. ज्यांना गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी शिमला मिर्ची खाल्ली पाहिजे. नूडल्स, बर्गर, पनीर टिक्का, चिकन रोस्टैड इत्यादी अनेक प्रकारच्या व्यजनांमध्ये याचा वापर केला जातो.