आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बाळंतपणानंतरचे वजन कसे कमी करायचे, असा प्रश्न बहुतांश बाळंतीणींना पडलेला असतो. हे वजन कमी करण्यात काही महिलांना यश येते तर काहींचे प्रयत्न वाया जातात. जास्तीत जास्त महिलांचे बाळांतपणात वाढलेले वजन तसेच राहिल्याने त्या पूर्वीपेक्षा लठ्ठ दिसू लागतात. गरोदरपणातील वजन घटवण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
१ बाळंतपणात वाढलेले वजन घटविण्यासाठी योग्य व संतुलित आहार घ्या. दिवसातून पाच वेळा योग्य प्रमाणात फळे व भाज्या खा. आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा. जास्त साखर, फॅट्स, मीठ आणि कॅलेरीज असलेले पदार्थ खाऊ नका.
२ फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. यासाठी ओट्स, सोयाबीन, डाळ, धान्य आणि बियाणांचा आहारात समावेश करा.
३ आहारात प्रोटीनचा केल्याने मेटाबॉलिज्म चांगले होते. यामुळे वजन लवकर कमी होते. यासाठी आहारात अंडी, मांस, मासे, शेंगदाणे, काजूचा समावेश करा.
४ दिवासाला एक लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्या. यामुळे वर्षाला दोन किलो वजन कमी होते.
५ योग्य आहारासह व्यायाम केल्याने शरीरातील चरबी लवकर कमी होईल. यासाठी बाळाला घेऊन चालायला जा. योगाही करा.
६ किमान आठ तास झोप घ्या. रात्री लवकर झोपा. हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
Visit : arogyanama.com