आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वनस्पतीयुक्त खाद्यपदार्थ कॅन्सरपासून रक्षण करतात. त्यामध्ये इसोफॅगस, पोट, कोलन, रेक्टम, लिव्हर, पॅन्क्रियाज, ओव्हरी, एंड्रोमेट्रियम आणि प्रोस्टेट ग्लँड या कॅन्सरचा समावेश आहे,असे वल्र्ड कॅन्सर रिसर्च फंड आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चमध्ये म्हटले आहे. रुग्णाने जेवणात प्रोटिन आणि कॅलरीयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे,असेही तज्ज्ञ सांगतात.गाजरात फॅल्केरिनॉल नावाचा एक फॅटी अल्कोहोल आढळून येत असून तो कॅन्सरची शक्यता कमी करतो. एवढेच नाही तर गाजरामध्ये असलेले बीटा-कॅरोटिनही कॅन्सरच्या विरोधात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत बनवते. लसूण, कांदा आणि हिरवा कांदा यासारख्या भाज्या प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतात. या भाज्यांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे एलियम कंपाउंड असतात, असे जर्नल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे.
टोमॅटोमध्ये आढळून येणारा लायकोपीन नावाचा अँटिऑक्सिडंट कॅन्सरच्या विरोधी गुणांसाठी ओळखला जातो. लायकोपीनचे चांगल्या प्रमाणात सेवन केल्याने ब्रेस्ट, प्रोस्टेट पँक्रीयाज आणि कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता कमी केली जाऊ शकते. सोयाबीनपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकारची फायटोजट्रोजंस पोषक द्रव्य असतात. हे द्रव्य कॅन्सर पेशी वाढण्यापासून रोखतात आणि ब्रेस्ट व प्रोस्टेट कॅन्सरची शक्यताही कमी करतात. द्राक्षांमध्ये बायोफ्लेव्होलॉयड्स आढळतात. हा एक प्रकारचा शक्तिशाली अँटिऑक्सिडंट घटक असून तो कॅन्सर रोखण्यात प्रभावी भूमिका बजावतो. द्राक्षे रेजव्हेराट्रोलचा चांगला स्रोत आहेत. तसेच कॅन्सर पेशी वाढवण्यास मदत करणारे एंझाइम्स रोखण्यासही द्राक्षांची मदत होते. ग्रीन आणि ब्लॅक दोन्ही प्रकारच्या चहामध्ये पॉलीफिनॉल्स असतात. यामुळे कॅन्सर पेशींचे विभाजन होत नाही. ग्रीन व ब्लॅक चहामध्ये या पेशी भरपूर प्रमाणात असतात.
तसेच या चहामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरची शक्यताही कमी होते. पौष्टिक आहारात कॅन्सरशी लढण्यास व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणाक्तया खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने कॅन्सरच्या उपचारास गती मिळते. त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णाने निरोगी जीवनशैली अंगीकारणेसुद्धा आवश्यक आहे. खास करून सिगारेट आणि दारूपासून त्याने दूर राहावे. फायबर वेस्ट आणि टॉक्सिंस स्वच्छ केल्याने त्यापासून होणारे आजार टाळले जाऊ शकतात. यामुळे वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते. अधिक वजनामुळेही कॅन्सर होण्याचा धोका असतो.ब्रोकोली, फुलकोबी, पत्ताकोबी आणि मोड आलेल्या कडधान्यात कॅन्सरशी लढा देणारे भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. यामध्येही ल्युटिन आणि जिजेंथिन हे प्रमुख कॅन्सर आहेत. ब्रोकोली, पत्ताकोबी आणि फुलकोबीमध्ये इंडेल-३ कार्बीनॉल नावाचे एक रसायन आढळून येते. हे रसायन ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. शास्त्रांच्या मते, जेवणात हिरव्या भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवल्याने कॅन्सरची शक्यता ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी होते.