औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटलची क्षमता वाढणार ; १०० खाटांचे रुग्णालय २६५ खाटांचे

Health News | link between neuroticism and long life

औरंगाबाद : आरोग्यनामा ऑनलाइन – औरंगाबाद शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या बांधकाम विस्तारीकरणाचा अंतिम प्रकल्प आराखडा तयार झाला आहे. हा डीपीआर ३८.७५ कोटींचा आहे. तो लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण करून ताबा मिळणार आहे. या विस्तारीकरणामुळे रुग्णालयात १६५ खाटा वाढतील. त्यामुळे १०० खाटांचे रुग्णालय २६५ खाटांचे होईल, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

बांधकाम विस्तारीकरणासाठी ३१ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. याचे काम एचएससीसी एजन्सीला देण्यात आले आहे. ही सुपरवायझिंग एजन्सी आहे. परंतु हा प्रस्ताव २०१५-१६ मध्ये तयार झाला होता. त्यामुळे त्याची अंदाजित रक्कमदेखील कमी होती; परंतु सध्याच्या दरानुसार दोन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये सादर झालेला डीपीआर ७७ कोटींवर गेला होता.

त्यामुळे उर्वरित निधी राज्य व केंद्र सरकारकडून मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आहे त्या रकमेत अत्यावश्यक ती कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले. यामुळे विस्तारीकरणातील बांधकामाच्या स्वरूपात बदल, फर्निचरमध्ये कपात आदी गोष्टींवर रुग्णालय प्रशासनाकडून भर देण्यात आला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सुधारित डीपीआर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ३८ कोटींचे प्राथमिक अंदाजपत्रक तयार करण्यात आले.