पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पादत्राणांमध्ये सर्वात आरामदायी म्हणून स्लीपर्स सर्रास वापरले जातात. स्लीपर्स जितके सोयीस्कर आहेत तितकेच ते धोकादायक ठरू शकतात. घरी वापरण्यासाठी किंवा जवळपास जाताना, बीचवर जाताना स्लीपर्स वापरले जातात मात्र योग्य पद्धतिने स्लीपर्स वापरले नाहीत तर ते पायांना हानी पोहचवू शकतात.
अनवणी पायापेक्षा फ्लिप फ्लॉप स्लिपर्स चांगल्याच आहेत, मात्र त्याचे काही तोटेदेखील आहेत. यामुळे पायांना हवा तितका आधार किंवा संरक्षण मिळत नाही. दीर्घकाळ स्लिपर घातल्यानं किंवा काही विशिष्ट कार्यावेळी घातल्यानं पायांच्या समस्या उद्भवू शकतात. फ्लिप फ्लॉप स्लिपर्स वापरायच्या असल्यास काही दुखापती टाळण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. असे तज्ञांचे म्हणणे आहे.
स्लीपर्समुळे उद्भवतात या समस्या
–पायांमध्ये वेदना
–फूट इन्फेक्शन होऊ शकतं
–पाठदुखी
–अंगठ्याला सूज
–पायातील नसांना हानी पोहोचण्याची शक्यता
फ्लिप फ्लॉफ्स ची नकारात्मक बाजु
फ्लिप फ्लॉफ्स ही सध्या फॅशन आणि आरामदायी स्लिपर म्हणून वापरली जाते. मात्र त्याची नकारात्मक बाजूदेखील आहे. स्लिपरमुळे अंगठ्याला आणि पायाच्या मागच्या भागाला आधार मिळत नाही, परिणामी घर्षणामुळे पायाच्या टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. तसंच योग्य आकाराच्या फ्लिप फ्लॉप न घातल्यास पायातील रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो. स्लिपर्सच्या वापरामुळे थेट पायाच्या नसांना हानी पोहोचत नाही. मात्र स्लिपर्स घालून जास्त चालल्यानं पायदुखी समस्या उद्भवू शकते.
फ्लिप फ्लॉफ्स वापरताना ही घ्या काळजी
–चांगल्या दर्जाचे सॉफ्ट लेदर असलेले स्लिपर खरेदी करा, यामुळे पायांना फोड आणि इतर समस्या कमी होतील
–स्लिपर्स पुढील टोकापासून मागच्या टोकापर्यंत वाकवून पाहा
–समुद्रकिनाऱ्यावर मजबूत असे स्लिपर्स घाला
–तेच स्लिपर्स जास्त वर्ष वापरू नका
–अंगठ्यामध्ये त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका
–जास्त लांबचा प्रवास असल्यास स्लिपर्स वापरू नका
–स्लिपर्स घालून खेळू नका, यामुळे पाय आणि पायाच्या घोट्याला दुखापत होऊ शकते.