आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी सकाळी फिरायला जाणे, जीममध्ये जाणे अशी अनेकांची धडपड सुरू असते. एकीकडे कामातून वेळ मिळत नाही आणि दुसरीकडे वजन वाढत चाललेले असते. वजन कमी करण्यासाठी महिलांचीही अशीच धावपळ सुरू असताना दिसून येते. मात्र, वजन कमी करण्यासाठी जीममध्येच गेले पाहिजे असे काही नाही. तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर दररोजची घरातील कामे करतानाही तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता. या कॅलरीज बर्न कशा करायच्या, कोणते काम केल्यानंतर किती कॅलरीज बर्न होतात, याविषयी अतिशय उपयोगी अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत.
घरातील सफाई करताना आपणे जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकतो. घरातील टेबल, कपाट अथवा रॅकची धूळ साफ करतानाही कॅलरी बर्न होतात. जर घराची अर्धा तास साफसफाई केली तर ८० कॅलरी बर्न होतात, असे तज्ज्ञ सांगातात. तसेच टीव्ही पाहताना सोफा अथवा खुर्चीवर बसून आराम करत असलात तरी शरीराची कॅलरी बर्न होते. एखादा तास टीव्हीवरील कोणताही कार्यक्रम पाहिला तरी ७२ कॅलरी बर्न होतात. तसेच कपडे गोळा धुण्याच्या प्रक्रियेतही आपण कॅलरीज बर्न करू शकतो. कपडे गोळा करणे, धुतलेले कपडे वाळल्यानंतर गोळा करणे, कपाटात ठेवणे अशी कामे करतानाही कॅलरी बर्न होतात. कुटुंबातील इतर सदस्यांचे कपडे गोळा करण्यासासाठी अर्धा तास लागल्यास शरीरातील ७२ कॅलरीज बर्न होतात.
तसेच बागकाम करतानाही तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता. बागेची देखभाल स्वत: करावी. काही दिवसांच्या गॅपनंतर ही देखभाल करत असल्यास ती कायम ठेवावी. दोन तास बागेत कापणी वा छाटणी केल्यास ६४८ कॅलरी बर्न होतात. तसेच एका संशोधनानुसार, एक तास शॉपिंग करणे ही पद्धत कॅलरी बर्न करण्यासाठी परिणामकारक आहे. किराणा सामान विकत घेणे, ट्रॉली ओढणे आणि सामान कार वा रिक्षात ठेवणे या हालचालींमुळे २४३ कॅलरी बर्न होतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दोन वा तीन मिनिटांपेक्षा अधिक ब्रश करू नये. तीन मिनिटांत ब्रश करताना तुमची ५.७ कॅलरी बर्न होते.