कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कॅल्शियम दात आणि हाडांना मजबूत बनवते. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कॅल्शियमसाठी सप्लिमेंट्स घेण्याची गरज नसते. दररोजच्या आहारात मोठ्याप्रमाणात कॅल्शियम असते. फक्त हे पदार्थ ओळखून त्यांचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. नैसर्गिकरित्या कॅल्शियम ज्या पदार्थांमधून मिळते असे पदार्थ कोणते, याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत.वयानुसार शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. १ ते ८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ५०० ते ८०० मि.ग्रॅम, वयस्कांसाठी (५० वर्षापर्यंत वय) १००० मिग्रॅम, ५१ च्या वर वय असलेल्या लोकांसाठी १२०० मिग्रॅम कॅल्शियमची गरज असते.
कोणत्या पदार्थांमध्ये कॅल्शियम असते
दुध : दुधामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. एक ग्लास दुधामधून शरीराला २४० मिग्रॅम कॅल्शियम मिळते.
लिंबू : नियमितपणे लिंबूपाणी घेतल्यास कॅल्शियम कमतरता नाहीशी होते. एक कप लिंबूपाण्यात ५५ मिग्रॅम कॅल्शियम असते.
केळी : केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक तेवढे कॅल्शियम मिळते. एका केळ्यात ६ मिग्रॅम कॅल्शियम असते.
पनीर : पनीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता दूर केली जाऊ शकते. एक कप पनीरमध्ये १३० मिग्रॅम कॅल्शियम असते.
सोयाबिन : सोयाबिनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. एक कप सोयाबिनमध्ये २०० मिग्रॅम कॅल्शियम असते.
बिन्स : बिन्स खाल्ल्याने प्रोटीन्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. ९० ग्रॅम बिन्समध्ये ५० मिग्रॅम कॅल्शियम असते.
गाजर : गाजरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. १२० ग्रॅम गाजरमध्ये ३६ मिग्रॅम कॅल्शियम असते.
दही : आहारात नियमित दही घेतले तर कॅल्शियमची कमतरता दूर होते. एक कप दह्यात ४०० मिग्रॅम कॅल्शियम असते.
गुळ : गुळाचा आहारात समावेश केल्यास भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि कॅल्शियम मिळते. एक कप गुळात ८० मिग्रॅम कॅल्शियम असते.
भाज्या : म्हणजे पालक, पत्ताकोबी, फुलकोबी, मेथी यामधून भरपूर कॅल्शियम मिळते. १२० ग्रॅम पालेभाज्यांमध्ये ११२ मिग्रॅम कॅल्शियम मिळते.