कॅल्सिफिकेशन आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे आणि त्यावरील उपाय
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कॅल्सिफिकेशन या आजारात शरीरातील टिश्यू, शिरा किंवा शरीरातील कोणत्याही भागात कॅल्शियम जमू लागते. शरीरात कॅल्शियमचा पुरवठा रक्तातून होतो. हा प्रत्येक पेशीमध्ये पसरत असतो म्हणून शरीराच्या कोणत्याही भागात कॅल्शियम जमा होऊ शकते. ज्या जागेवर कॅल्शियम जमा होते ती जागा कडक होऊ लागते. यामुळे हालचाल करण्यास त्रास होतो.
शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम हे दात आणि हाडांमध्ये, तर १ टक्का रक्त, मांसपेशी आणि पेशींमध्ये आणि टिश्यूमध्ये असते. काहीवेळा एका विशिष्ट भागात कॅल्शियम जमा होऊन पुढे कॅल्सिफिकेशन आजार होतो. कॅल्शियम शरीरातील कोणत्याही भागात जमा होऊ शकते. लहान धमण्या, हार्ट व्हॉल्व्ह, मेंदू, सांधे, छाती, मांसपेशी, किडनी आणि मूत्राशय आदी ठिकाणी हे कॅल्शियम जमा होऊ शकते. कॅलिफोर्नियाच्या स्कूल ऑफ मेडिसिननुसार, सूज आणि दुखापत झाल्यास कॅल्शियम जमा होते. त्यामुळे सर्वच बाबतीत कॅल्शियम जमा होणे धोकादायक नसते. मात्र, धमण्या आणि अवयवांमध्ये जमा होणे ही गंभीर बाब आहे.
कॅल्शिफिकेशनची अनेक कारणे आहेत. संक्रमण, कॅल्शियम मेटाबॉलिझम डिसऑर्डर म्हणजे हायपरकॅल्शिमिया आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर यामुळे कॅल्शिफिकेशन होऊ शकते. या आजारामुळे शरीराच्या प्रणालीला आणि हाडांना जोडणाऱ्या पेशींवर परिणाम होतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीनुसार, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्यामुळे असे होते, असा गैरसमज आहे. कारण अशा वेळी मुतखडा होण्याची शक्यता असते. शरीरातून कॅल्शियम ऑक्झलेट बाहेर न पडल्यामुळे स्टोन होऊ शकतो. रक्त तपासणी आणि एक्स-रेच्या मदतीने हा आजार समजू शकते. उपचारासाठी सूज कमी करण्याची औषधी आणि आइस थेरपी केली जाते. कॅल्शियममुळे जास्त नुकसान झाल्यास सर्जरी करावी लागते.
६२ वर्षीय चित्रपट अभिनेता अनिल कपूर यांनाही कॅल्सिफिकेशन ऑफ शोल्डर हा आजार झाला आहे. त्यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. दोन वर्षांपासून त्याच्या उजव्या खांद्यामध्ये कॅल्शियम जमा होत असून खांदे कडक झाले आहेत.