आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी अनेकांची नेहमीच धडपड सुरू असते. विशेषत: महिला यासाठी अधिक प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. खरं तर सौंदर्य हे आरोग्यावरच आवलंबून आहे. तुमचे आरोग्य चांगले नसेल तर सौंदर्यावर त्याचे वाईट परिणाम तात्काळ दिसून येतात. हे दोन्ही जपण्यासाठी शेकडो वर्षांपासून अनेक घरगुती उपाय केले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ताक होय. ताक नियमित घेतल्याने तुमचे आरोग्य आणि सौंदर्य वाढू शकते. ताकासारखे पेय एक नव्हे, तर अनेक आरोग्य फायदे आपल्याला देते.
हे आहेत फायदे
* सुरकुत्या
ताकात आटा मिसळून तयार केलेला लेप त्वचेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.
* पिंपल्स
गुलाबाचे मुळ दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.
* मानसिक ताण
ताक ताणतणावातून मुक्तता करते. शरीरासह डोक्यातील उष्णताही कमी होते.
* भाजणे
किरकोळ भाजले असेल तर ताक त्याठिकाणी ताक लावावे. फायदा होतो.
* खाज
अमलतासाचे पान बारिक करून ताकात मिसळून जाडसर लेप तयार करा. हा लेप शरीरावर लावा. थोड्या वेळाने आंघोळ करा. यामुळे खाज थांबते.
* विष
एखाद्या व्यक्तीने विष सेवन केले असेल तर वारंवार फिकट ताक पाजावे.
* विषारी दंश
विषारी किडा चावला असल्यास ताकात तंबाखू मिसळून दंश झालेल्या ठिकाणी लावा. नंतर डॉक्टरांकडे जा.
* टाचांना भेगा
टाचांना भेगा पडल्या असल्यास ताक काढताना निघाणारे लोणी लावा.
* पचन
उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
* लठ्ठपणा
ताकात काळे मीठ टाकून प्यायल्यास वजन कमी होते.
* रक्तदाब
अमृत वल्लीचे चूर्ण ताकासोबत घेतल्यास रक्तदाब नियंत्रित होतो.
* स्मरणशक्ती
दिसातून दोन वेळा ताक नियमित घेतल्यास स्मरणशक्ती वाढते.
* उचकी लागणे
उचकी लागली असल्यास ताकात एक चमचा सुंठ प्या.
* मळमळ, उलटी
मळमळणे, उलटीचा त्रास होत असल्यास ताकात जायफळ उगाळून प्या.