पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – तज्ज्ञांच्या मते मनोविकार म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन बिघडणं. यामुळं एका व्यक्तीला इतर लोकांशी जमवून घ्यायला आणि रोजची कामं करायला कठीण जातं. मानसिक आरोग्य हा सध्याचा खूप मोठा सामाजिक विषय आहे. आणि ताण आणि नैराश्य तर मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चेत असणारे विषय आहेत. आज अगदी १५-१६ वर्षाचा मुलगा ही नैराश्य आलं म्हणून आत्महत्या करतो आहे. ताण ही अनेकांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. मात्र ताणाचे परिणाम व नैराश्याची कारणे इतरही असू शकतात. रोजची दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे विषय आहेत. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी अपमान यापैकी एखाद्या कारणाने आत्मसन्मानावर झालेला आघात, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे या तणावमुळे मानसिक आजार होऊ शकतात.
* मानसिक आजरापासून सुटका करण्याच्या टिप्स पुढीलप्रमाणे *
१) नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असतात. ती परिणामकारी आणि सुरक्षित आहेत. नैराश्य हा दीर्घकाळाचा आजार असल्याने ही औषधे आयुष्यभरही घ्यावी लागू शकतात.
२) नैराश्यात समुपदेशनाचे शिक्षण घ्यावे. याचा तणाव कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो.
३) तज्ज्ञांच्या मदतीनं तुम्ही यशस्वीपणे मनोविकारावर मात करू शकता. तेव्हा, सगळ्यात आधी अनुभवी मनोविकार तज्ज्ञाकडून आपल्या आजाराचं अचूक निदान करून घ्या.
४) अनुभवी मनोविकार तज्ज्ञांनी सुचवलेला उपचार काटेकोरपणे पाळा.
५) संतुलित दिनक्रम राखा.
४) स्वतःला कामात व्यस्त ठेवा.
५) पुरेशी झोप घ्या.
६) दररोज अशा गोष्टी करा ज्यामुळं तुमचं मन रमेल.
७) पौष्टिक व संतुलित आहार घ्या.
८) मद्याचं सेवन कमी करा आणि डॉक्टरांनी लिहून दिली नसतील अशी औषधं घेऊ नका.
९) एकटं-एकटं राहू नका; भरवशाच्या व तुमची काळजी करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा.
१०) आपल्या आध्यात्मिक आरोग्याकडे लक्ष द्या.