आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एकाच ठिकाणी जास्त वेळ बसण्याची सवय असल्यास बल्जिंग डिस्कची समस्या होऊ शकते. याची सुरुवात पाठीच्या मणक्यापासून होते. नंतर त्याचा प्रभाव हळूहळू शरीराच्या अन्य भागांवरही होते. वेळीच उपचार घेतल्यास पुढील त्रास होत नाही. अन्यथा संपूर्ण शरीरामध्ये वेदना होतात. हा आजार ३० ते ५० वर्षे वयोगटातील लोकांना होतो. अभिनेत्री अनुष्का शर्माला सुद्धा काही महिन्यांपूर्वी बल्जिंग डिस्क आजार झाला होता. हा सामान्य आजार असल्याने औषधोपचार करून डॉक्टरांनी तिला आरामाचा सल्ला दिला होता.
ही आहेत कारणे
१) कार्यालयामध्ये उशिरापर्यंत एकाच ठिकाणी बसून काम करणे
२) वाकून चालल्याने बल्जिंग डिस्क होण्याची शक्यता वाढते.
या गोष्टींकडे लक्ष द्या
१) एकाच ठिकाणी बसू नका. सतत पोझिशन बदलत राहा.
२) पोश्चर योग्य ठेवा. तसेच चालल्याने हा आजार होण्याचा धोका कमी होतो.
३) वजन नियंत्रित ठेवा. लठ्ठपणा वाढल्याने हा आजार होऊ शकतो.
४) पौष्टिक आहार घ्या. आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्या.
५) जीवनशैली बदला. धूम्रपान आणि अल्कोहोल बंद करा.
६) तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय व्यायाम करू नका
ही आहेत लक्षणे
* या आजारामध्ये कमरेच्या खालच्या भागामध्ये तीव्र वेदना होतात.
* मानेमध्ये दुखते. त्रास वाढल्यानंतर खांदे व हातांमध्येही वेदना होतात.
* खोकला किंवा शिंक आल्यावर वेदना जास्त होतात.
* हाता-पायांमध्ये ठणक निर्माण होतो. स्नायूंमध्येही वेदना होतात.
* वस्तू उचलताना किंवा खाली वाकतानाही वेदना होतात.
असे करा उपचार
* डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
* फिजियोथेरपीद्वारेही यावर उपचाराचा सल्ला दिला जातो.