आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत खूप कमी पोषकतत्वे असतात. परंतु जरी पोषकतत्वे कमी असले तरी वांग्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर आणि लो कॅलरीज तसेच लो फॅटयुक्त असल्यामुळे तसेच वांग्यामध्ये मॅगनीज आणि लोहाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे वांगी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात वांग्याच्या भाजीचा उपयोग अवश्य करा.
वांगी खाण्याची फायदे खालीलप्रमाणे :
१) वांग्यामध्ये प्रोटीन, व्हिट्यामिन ए, व्हिट्यामिन बी, व्हिट्यामिन सी, आयर्न, कार्बोहायड्रेट याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे वांगे खाणे फायदेशीर ठरते.
२) वांग हे आपल्या मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण वांग खाल्ल्याने आपल्या मेंदूला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. उलट वांग्यामुळे आपल्या मेंदूचा चांगला विकास होतो.
३) वांग्यामध्ये कोलेस्ट्रॉल खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वांग खाल्लं तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. आणि आपल्या हृद्यासंबंधी आजारासाठी वांगे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे वांग्याचा आपल्या आहारात नक्की समावेश करा.
४) वांग हे आपला लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. कारण वांग्यामध्ये कॅलरी खूप कमी असतात. त्या आपले वजन कमी करण्यास मदत करतात. आणि यात असणाऱ्या फायबर मुळे पोट लवकर भरते. आणि भूकही लागत नाही. त्यामुळे आपले वजन लवकर कमी होते.