आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना परळच्या ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी ब्रायन लारावर एन्जियोग्राफी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. छातीत दुखत असल्याने त्यांना सोमवारी संध्याकाळी ग्लोबल रूग्णालयात आले होते. लारा यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, ब्रायन लारा यांनी त्यांची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही म्हटले आहे. ग्लोबल रूग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लारा यांच्यावर एन्जियोग्राफी केली. एन्जियोग्राफीनंतर लारा यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.