आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आईचे दूध बाळासाठी खुप महत्त्वाचे असते. यावरच बाळाची वाढ आवलंबून असते. यातून मिळणारे पोषक घटक बाळाला अन्य कोणत्याच माध्यमातून मिळू शकत नाहीत. शिवाय, मातेसाठी सुद्धा स्तनपान आवश्यक असते. स्तनपान हे आईच्या आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे, ते जाणून घेवूयात.
हे आहेत स्तनपानाचे फायदे
१. आई आणि बाळाचे नाते दृढ होते
२. स्तनपान करताना संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे सुद्धा आई आणि बाळ यांच्या नात्यात दृढता आणणारे ठरतात.
३. माता आणि त्यांचे मूल यांच्यामध्ये एक उच्चपातळीचे भावनिक संबंध निर्माण होतात.
४. स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते
५. मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास तसेच गर्भधारणेआधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते