आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आईचे दूध बाळासाठी खुप महत्त्वाचे असते. यावरच बाळाची वाढ आवलंबून असते. यातून मिळणारे पोषक घटक बाळाला अन्य कोणत्याच माध्यमातून मिळू शकत नाहीत. मातेचे दूध बाळाच्या आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे, ते जाणून घेवूयात.
बाळाला होतील हे फायदे
१ स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा व विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमता उंचावते
२ स्तनपानामुळे बाळाचा जबडा आणि जीभ यांचा योग्य विकास होतो.
३ बाळाच्या दातांचे आरोग्य आणि वायुमार्गाच्या योग्य विकासासाठी स्तनपान अधिक महत्वाचे आहे.
४ आईचे दूध उत्तम पोषणाचा स्रोत आहे.
५ बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते.
६ या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता कमी होते.
Visit : arogyanama.com