‘ही’ लक्षणे असतील तर पुरुषांना होऊ शकतो स्तनाचा ‘कर्करोग’ ; जाणून घ्या
आतापर्यंत स्तनाचा कर्करोग स्त्रीयांच्या आजाराशी संबंधित आहे असा एक समज आहे. मात्र पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पुरुषांमध्ये हा रोग स्त्रियांच्या तुलनेत लवकर पसरतो. अनुवांशिकता हा पुरुषांमध्ये असलेल्या या रोगाचा महत्त्वाचा घटक आहे. छातीवर लिंफोमा सारखे रेडिएशन उपचार करत असेल तर त्या पुरुषाला कर्करोग होण्याची शक्यता असते. इस्ट्रोजन हार्मोन वाढवणारी औषध घेतल्यानेही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे –
१) स्तनांमध्ये प्रचंड वेदना जाणवणे.
२) स्तनभोवती त्वचा कमी होणे
३) पोखरलेली स्तन त्वचा
४) निप्पल किंवा आजूबाजूच्या भागामध्ये नेहमी खाज येणे किंवा रॅशेस होणे
५) निप्पलच्या खाली किंवा आजूबाजूचा भाग कडक किंवा रफ होणे.
६) निप्पल किंवा आजूबाजूच्या भागामध्ये जखम होणे
७) स्तनाच्या त्वचेतून रक्त येणे.
असे करा या आजाराचे निदान –
ब्रेस्ट टिश्यूच्या मॅमोग्राम आणि बायोप्सीद्वारे या रोगाचे निदान होऊ शकते.
Comments are closed.