आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच हंगामी आजार वाढू लागतात. बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लवकरच दिसू लागतो. या हंगामात पोटाचे आजार, सर्दी- ताप आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात असतो, जर खाणेपिणे योग्यरीत्या ठेवले तर या हंगामी त्रासांपासून सुरक्षित राहू शकतो. यासाठी या हंगामात मुनका खूप उपयुक्त आहे. मनुका हे आयुर्वेदिक गुणधर्म असलेले एक ड्राय फ्रुट आहे जे द्राक्षे सुकवून बनवले जाते. मनुके हे गरम असतात. थंड हवामानात ते केवळ आपले शरीर उबदार ठेवतच नाही तर सर्दी- ताप आणि व्हायरलपासून देखील बचाव देखील.
सर्दी – ताप टाळण्यासाठी :
महिलांमध्ये पोषण नसल्यामुळे अशक्तपणा होतो. आपल्याला अशक्तपणा टाळायचा असेल तर मनुके खा. मनुक्यात असलेले लोह, व्हिटॅमिन बी आणि तांबे अशक्तपणा दूर करतात. मनुक्यात उपस्थित असलेले तांबे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करतो.
दातांच्या संरक्षणासाठी :
मनुक्यात ऑलेक्नोइक अॅसिड असते, जे दात खराब होण्यापासून वाचवते तसेच दातांची पोकळी देखील काढून टाकते. मनुके दातांचे बॅक्टेरियापासून संरक्षण करतात.
मनुक्यात फायबर असते जे पोट फिट ठेवते. रात्री झोपण्यापूर्वी 5 मनुका खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसच्या रोगापासून मुक्तता मिळते.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.