आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजच्या धावपळीच्या काळात अस्वस्थता, टेन्शन्स यांमुळे शरीर कमजोर होते. याचा परिणाम पौरुषत्वावरही ( टेस्टोस्टेरॉन हार्मोन ) होत असतो. टेस्टोस्टेरॉन म्हणजे लैंगिक क्षमता वाढवणार संप्रेरक. चांगल्या वैवाहिक जीवनासाठी हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी झाल्यास वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवण्यासाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले आहेत. सोप्या घरगुती उपयांनी हे विकार दूर करता येऊ शकतात.
टेस्टोस्टेरॉनची कमतरता दूर करण्यासाठी उपाय
१) आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
२) रोज एक केळं खाऊन दूध प्या.
३) आहारात झिंक आणि मॅग्नेशिअमसारखे खनिज मिळतील अशा पदार्थांचा समावेश करावा.
४) जेव्हा गोड काही खाल्लं जातं. तेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपोआप कमी होतं. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावे.
५) कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांमुळे टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो. त्यामुळे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ टाळावेत.
६) रोज रात्री झोपताना लसणाच्या दोन पाकळ्या खाऊन पाणी प्यावं.
७) जास्तीत जास्त कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश तुमच्या आहारात करा.
८) अल्कोहोल , नशा करणे टाळा. अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोनमध्ये कमतरता येते.