आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Boiled Egg Benefits | अंडी हे असेच एक अन्न आहे, जे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडते. शाकाहारी लोकांनाही अंडी खायला आवडतात. हिवाळ्यात अंडी आजारांपासून संरक्षण करते. रोज 1 उकडलेले अंडे खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात. (Boiled Egg Benefits)
अंड्यातील पोषक घटक (Egg nutrients)
अंड्यात भरपूर प्रोटीन असतात, जी आरोग्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी 12, बायोटिन, थायमिन आणि सेलेनियम असते. ही सर्व व्हिटॅमिन केस, त्वचा आणि नखांसाठी खूप महत्वाची आहेत.
आहारतज्ञ सांगतात की, अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये असलेले व्हिटॅमिन डी सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यास मदत करते. रोज नाश्त्यात उकडलेले अंडे खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते. हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर रोज एक उकडलेले अंडे खा.
उकडलेल्या अंड्याचे आरोग्यदायी फायदे (Egg Benefits) –
– एका अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असतात. यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते आणि शक्ती मिळते.
– शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्यातील पिवळा भाग खावा.
– तणावावर मात करण्यासाठी आहारात उकडलेले अंडे घ्या. कारण यात व्हिटॅमिन बी 12 असते जे तणाव दूर करण्यास मदत करते.
– अंड्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांच्या आजारांचा धोकाही कमी होतो.
– रोज एक अंडे खाल्ल्याने मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो.
उकडलेले अंडे खाण्याची उत्तम वेळ (best time to eat boiled eggs)
आहारतज्ज्ञ सांगतात की, सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाणे अधिक फायदेशीर ठरते. अंड्याची डिश तयार करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. त्यात मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक भरपूर असतात.
Web Title :- Boiled Egg Benefits | Boiled egg benefits best time to eat boiled eggs benefits of protein rich boiled egg