फेशियल करण्यापुर्वी ‘ही’ काळजी आवश्य घ्या, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी अनेक महिला आणि पुरुषांमध्ये फेशियल करण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे अनेक पुरुष आणि स्रिया फेशियल करतात. फेशियल केल्यामुळे आपली त्वचा जरी तजेलदार होते. त्यामुळे फेशियल केल्याने तुमच्या त्वचेला काय फायदा होतो. फेशियल त्वचेसाठी कसे फायद्याचे आहे. ते जाणून घ्या.

१)  क्लिनिंगमध्ये त्वचेला अनुरूप अशा cleanser नी त्वचा साफ केली जाते. याने त्वचेवरील निर्जीव झालेल्या पेशींचा जो परत असतो तो साफ होतो. व त्वचेवरील साठलेली घाण साफ होते आणि नंतर वापरल्या जाणारे क्रीम्स चा फायदा जास्त होतो.

२) नंतर स्टिम दिली जाते. जेणेकरून त्वचेवरील रंध्र उघडे होतात. शिवाय त्वचेला होणारा रक्त पुरवठा वाढतो. ज्या लोकांना मुरूम असतात ते या टप्प्यात काढले जातात.

३) त्वचा रुक्ष असेल तर तेल युक्त क्रीम्स लावल्या जातात. आणि जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेवरील तेल कमी करणारे क्रीम्स वापरले जातात. चेहऱ्यावरील जो मसाज केला जातो. तो विशिष्ठ पद्धतीने केला जातो. मानेवर जर मसाज करायचा असेल तर त्याची पद्धत वेगळी असते.

४) फेशिअलचा शेवटचा टप्पा म्हणजे पॅक लावणे. यात परत एकदा त्वचेच्या प्रकारानुसार व त्वचेची गरज बघून कोणता पॅक लावायचा हे ठरवलं जातं. याने त्वचा मॉचराईझ होते.