आरोग्यनामा ऑनलाईन टीम – Home remedies | काही व्यक्तींच्या शरीराला पावसाळ्यात दुर्गंधी येते. यासाठी ते विविध प्रकारचे डिओ आणि परफ्यूम वापरतात. मात्र, त्याचा प्रभाव काहीकाळच राहत असल्याने पुन्हा ही समस्या जाणवते. ही समस्या दूर करण्यासाठी काही खास घरगुती उपाय असून ते केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. या उपायांची सविस्तर माहिती घेवूयात. (Home remedies)
हे आहेत उपाय
१) चंदन
अर्धा चमचा चंदनाची पेस्ट काखांमध्ये लावा. पंधरा मिनिटांनंतर आंघोळ करा.
२) मसूर डाळ
एक चमचा मसूर डाळीची पावडर तिन चमचे लिंबाच्या रसात भिजवा. हे मिश्रण लावून दहा मिनिटांनंतर आंघोळ करा.
३) टोमॅटोचा रस
आंघोळीच्या पाण्यात टोमॅटोचा रस टाकून आंघोळ करा.
४) तृणधान्य रस
दोन चमचे तृणधान्य रस नियमित प्यायल्याने हा त्रास कमी होतो.
५) तुरटी
आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर तुरटी पावडर टाकून आंघोळ करा.
६) कापराचे तेल
आंघोळीच्या पाण्यात एक चमचा कापराचे तेल मिसळून आंघोळ करा.
७) शलजम
शलजमचा रस शरीराला लावून पंधरा मिनिटांनंतर आंघोळ करा. हे एकप्रकारचे कंद आहे.
८) लिंबू रस
कापसाने लिंबाचा रस शरीरावर लावा. दहा मिनिटांनंतर आंघोळ करा.
९) बेकिंग सोडा
एक चमचा बेकिंग सोड आणि लिंबूचा रस एकत्र करा. हे मिश्रण शरीरावर लावून पाच मिनिटांनंतर आंघोळ करा.
१०) अॅपल साइडर व्हिनेगर
हे दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी लावून दहा मिनिटांनंतर आंघोळ करा.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे