• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

by Dnyaneshwar Phad
July 1, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा
6
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणताही आजार होण्यापूर्वी आपले शरीर या आजाराचे संकेत देते. या संकेतांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ही लक्षणे जर वेळीच ओळखली तर भविष्यातील गंभीर आजार टाळता येऊ शकतो. शिवाय, समस्येचे वेळीच निदान झाल्याने औषधोपचार सुरू करता येतात.

डिस्पेनिया म्हणजेच श्वास घेण्यास त्रास हा हृदयाशी संबंधित सर्वात सामान्य संकेत आहे. यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. ही कार्डिएक किंवा पल्मोनरी म्हणजेच फुप्फुसाशी संबंधित आजाराचीही लक्षणे असू शकतात. अशावेळी चालताना, धावताना, पायऱ्या चढताना, काम करताना किंवा काही पावले चालल्यावरही श्वास घेण्यास त्रास होतो. दुसरा संकेत म्हणजे छातीत दुखणे होय. यास वैद्यकीय भाषेत एंझायमा म्हणतात.

अस्वस्थ, छातीत दाबल्यासारखे किंवा शरीर सुन्न होण्यासारखी लक्षणे दिसून आल्यास ती हृदयाच्या त्रासाशी संबंधित आहेत. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच हृदयाचे ठोके अनियमित होणे देखील हृदयरोगाचा संकेत आहे. साधारणत: लोक आपल्या हृदयाच्या सामान्य वेगापासून अनभिज्ञ असतात. हृदयाचे ठोके वेगाने किंवा मंदगतीने होत असल्यास त्याकडे कानाडोळा करू नये. अशावेळी पीडिताला मान किंवा छातीत चावल्यासारखे आणि दाब पडत असल्यासारखे जाणवते.

तर दम लागणे, अचानक डोके दुखणे, चेतनेत कमतरता येणे, घामाने भिजणे आणि घाबरल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे हृदयरोगांशी संबंधित असू शकतात. थोडेसे काम केल्यास लवकर थकवा येणे किंवा दम लागणे हे किडनी आणि लिव्हरची कार्यप्रणाली बाधित होण्याचे संकेत आहेत. असे गॅस्ट्रोइंटेस्टिनल किंवा मधुमेह झाल्यावरही होऊ शकते. त्यामुळे याकडेही गांभीर्याने पाहावे.

Tags: arogyanamaBodydoctorMedicineआजारआरोग्यनामाऔषधडॉक्टरशरीर
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.