आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar Level Control | मधुमेह (Diabetes) हा आजार एकदा झाला की तो कायम आपल्यासोबत राहतो. खराब जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Bad Lifestyle, Stress And Bad Eating Habits) हा आजार अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो. मधुमेहावर नियंत्रण (Blood Sugar Level Control) ठेवणे खूप गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल (Dietary Changes) करणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या लोकांच्या रक्तात साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) जास्त आहे, अशा लोकांनी नियमित औषधे घ्यावीत आणि ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असेल अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (Blood Sugar Level Control) करतात.
सर्वसाधारणपणे, जे पदार्थ रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी सर्वात जास्त वाढवतात ते कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) समृध्द पदार्थ असतात. पांढरा भात (White Rice) आणि ब्रेडमध्ये (Bread) रिफाईंड कार्बोहायड्रेट्स (Refined Carbohydrates) असतात आणि त्यात प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) कमी असतात, ज्यामुळे ते साखर वेगाने वाढवतात.
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम (Exercise) आणि औषधे (Medications) खूप महत्त्वाची आहेत, पण साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहार कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घ्या (Let’s Know Which Foods You Can Include In Your Diet To Control Sugar).
साखर नियंत्रित करण्यासाठी हे पदार्थ सेवन करा (Eat These Foods To Control Sugar)
आहारात करा अॅव्होकॅडोचा समावेश (Include Avocado In The Diet) :
अॅव्होकॅडो (Avocado) हे साखरेच्या रुग्णांसाठी एक फळ आहे ज्यामध्ये साखरेचे प्रमाण (Sugar Level) खूपच कमी असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, तसेच शरीराला ऊर्जा (Energy) देते. अॅव्होकॅडोमध्ये हाय फॅट (High Fat) आणि लो कार्बोहायड्रेट (Low Carbohydrate) असते जे रक्तातील साखर नियंत्रित करते. याचे सेवन केल्याने वजनही कमी होते.
मासे खा (Consume Fish) :
मासे (Fish) हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यात चरबीचे प्रमाण कमी असते.
हे ओमेगा -3 फॅटी अॅसिडचा (Omega-3 Fatty Acid) उत्कृष्ट स्त्रोत आहे. साखरेच्या रुग्णांसाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे.
लसणाचे सेवन करा (Consume Garlic) :
लसूणमध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याची क्षमता असते. लसणाच्या सेवनाने फास्टिंग शुगर (Fasting Sugar) नियंत्रणात ठेवता येते,
असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. लसणाचा ग्लायसेमिक इंडेक्स 10-30 असतो, जो खूप कमी आहे, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो.
आहारात करा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश (Include Green Leafy Vegetables In The Diet) :
पालेभाज्यांमध्ये फायबर (Fiber), मॅग्नेशियम (Magnesium) आणि व्हिटॅमिन ए (Vitamin A) सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
या भाज्या पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही प्रामुख्याने पालक आणि काळे यांचे सेवन करा.
चिया सीड्स कंट्रोल करते शुगर (Chia Seeds Control Sugar) :
चिया सीड्समध्ये फायबर, फॅट, ओमेगा-3, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. चिया सीड्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात,
असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. चिया सीड्सचा ग्लायसेमिक इंडेक्स 1 आहे जो साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
फूड्स जे वाढवतात ब्लड शुगर (Foods That Raise Blood Sugar)
– शुगर रुग्णांनी त्यांच्या आहारात या गोष्टी टाळाव्यात.
– बटाटे, व्हाईट ब्रेड, पांढरा भात, तळलेले पदार्थ, मांस आणि कॅन्ट फूड जे आपण रोज खातो ते रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात.
साखर नियंत्रित करण्यासाठी ते टाळा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Blood Sugar Level Control | which foods can control blood sugar know what kind of foods avoid in your diet for manage diabetes
BP Control Tips | ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय अवलंबा; जाणून घ्या