आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेही रुग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढते, त्यामुळे ते शुगरच्या आजाराला बळी पडतात, परंतु काही लोक असे आहेत जे टाईप 1 किंवा टाईप 2 मधुमेहाने (Type 1 Or Type 2 Diabetes) पीडित नसून देखील त्यांची ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. मधुमेह (Diabetes) नसलेल्यांची ब्लड शुगर (Blood Sugar) लेव्हल वाढण्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
नॉन डायबेटिजमध्ये हाय ब्लड शुगर का होते (Why Non-Diabetics Have High Blood Sugar) ? :
हाय ब्लड शुगर किंवा हायपरग्लायसेमियात (Hyperglycemia) रक्तात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. नॉन डायबेटिज रूग्णांमध्ये, तणाव किंवा इतर जुनाट स्थितींमुळे ब्लड शुगर (Blood Sugar) लेव्हल वाढू शकते. ब्लड शुगर लेव्हल सतत वाढल्याने हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम होतो.
यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा (Heart Attack And Stroke) धोका वाढू शकतो. जर फास्टिंग ग्लुकोज लेव्हल जेवणानंतर 100-125 mg/dl किंवा 180 mg/dl पेक्षा जास्त असेल तर त्या स्थितीला हायपरग्लाइसेमिया म्हणतात.
नॉन डायबेटिज रुग्णांमध्ये ब्लड शुगर वाढण्याची कारणे (Causes Of High Blood Sugar In Non-Diabetic Patients) :
– पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम
– तणाव
– संसर्ग
– लठ्ठपणा
– काही औषधे घेतल्याने
नॉन डायबिटिज हायपर ग्लायसेमियाची लक्षणे (Symptoms Of Non-Diabetic Hyperglycemia) :
नॉन डायबिटिज हायपर ग्लायसेमियाची लक्षणे मधुमेहाच्या हायपरग्लायसेमियासारखीच असतात, ज्यात जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अंधुक दिसणे, मळमळ आणि उलट्या होणे, पोटदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
सामान्य ब्लड शुगर लेव्हल किती असावी (What Should Be The Normal Blood Sugar Level) ?
– फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 70-100 mg/dl च्या दरम्यान असावी, जर ही पातळी 100-126 mg/dl पर्यंत पोहोचली तर ती मधुमेहपूर्व स्थिती मानली जाते.
– जेवणानंतर 2 तासांनी शुगर लेव्हल 130-140 mg/dl असल्यास हे सामान्य आहे. जर शुगर लेव्हल 200-400 mg/dl असेल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
– वयानुसार ब्लड शुगरच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाल्यास, 6-12 वर्षे वयात उपाशीपोटी, शुगर लेव्हल 80 ते 180 mg/dl असावी.
– दुपारच्या जेवणानंतर, शुगर लेव्हल 140 mg/dl पर्यंत जाऊ शकते.
– रात्रीच्या जेवणानंतर 100 ते 180 mg/dl शुगर लेव्हल सामान्य मानली जाते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- know the reason for high blood sugar in non diabetics and what should be the normal blood sugar levels according to age
Weight Loss Tips | पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी पडतील ‘हे’ 7 आयुर्वेदिक उपाय; जाणून घ्या
Health Tips | उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून रक्त येतेय?; नका करु काळजी, ‘हे’ करा घरगुती उपाय