आरोग्यनामा ऑनलाईन- आता 60 वर्षांच्या आतील व्यक्तींसाठी युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीनं (ईएससी) रक्तदाब(blood pressure) पातळी (बेसलाईन) 140/90 वरून आता 130/80 खाली आणली आहे. तर 60 वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी 140-90 एवढी रक्तदाबाची पातळी निश्चित केली आहे. युरोपियन सोसायटीनुसार अमेरिकतेही 130/80 अशी बेसलाईन रक्तदाबाची पातळी ठेवण्यात आल्यानं आता भारतीय तरुणांचा रक्तदाब(blood pressure) नियंत्रणात ठेवण्यासाठी हीच पातळी निश्चित मानली जाणार आहे. तरुणांमध्ये रक्तदाब वाढत असून तिशीतच या आजारानं गाठल्यानं हे निकष निश्चित करण्यात आल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ईएससी) कडून हजारो जणांचा रक्तदाब तपासण्यात येतो. यावरून रक्तदाबाच्या पातळीचं धोरण ठरवलं जातं. युरोपमध्ये रक्तदाब हा प्रत्येक व्यक्तीच्या वजन आणि उंचीच्या (बीएमआय) गणितावरून ठरवला जातो. युरोपीयन आणि भारतीय नागरिकांच्या बीएमआयमध्ये फरक आहे. युरोपीयन नागरिकांमध्ये उंची अधिक असते तर भारतीय नागरिकांमध्ये लठ्ठपणा अधिक असतो. यामुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळं रक्तदाब हा 130/80 हा साधारण मानला जातो. तर 140/90 हा प्री हायपरटेंशन म्हणतो. 140 च्या पुढं रक्तदाब गेला तर त्यांना रक्तदाबाचा आजार होतो. रक्तदाब 130/80 च्या पुढं गेला तर त्या व्यक्तीच्या लक्षणांवरून औषधं सुरू करायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जातो अशी माहिती फिजीशियन डॉ शिशिर जोशी यांनी दिली आहे.
अमेरिकन हार्ट सोसायटीनं तरुणांमध्ये रक्तदाब 130/90 इतका असावा असं सांगितलं आहे. तर 140/90 वरून ती पातळी खाली आणली आहे. तरुणांमध्ये रक्तदाब वाढत असेल तर त्यांनी काळजी घ्यायला हवी.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.