आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्या महिलांना चाळीशीत उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृती म्हणजेच डिमेन्शियाचा आजार होण्याचा धोका वाढतो. चाळीशीतील ज्या महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास नाही किंवा ज्या नॉर्मल आहेत, त्यांच्यापेक्षा उच्च रक्तदाब असलेल्या महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो, असे कॅलिफोर्निया येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.
हे लक्षात ठेवा
१. कोणताही आजार पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्याने बघावे. दुर्लक्ष केले तर मात्र नंतर उपचार करणे कठीण होते, शिवाय काही गोष्टी हाताबाहेर जातात.
२. तरुण वयातच अथवा लहान वयापासूनच आरोग्याकडे लक्ष द्या.
३. ज्यांना चाळीशीत ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी वेळीच लक्ष देऊन उपचार घ्यावेत.
४. चाळीतील उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केले तर नंतर तुम्हाला काहीच आठवणार नाही.