आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयाच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगभरात हे आजार वेगाने वाढत आहेत. ही समस्या आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या पैकी ब्लडप्रेशरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे तरूणांमध्येही रक्तदाबाची समस्या आढळून येत आहे. ब्लडप्रेशर मुळेच हृदयाचे आजार, स्टोक अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. रक्तदाबाच्या या समस्येवर काही घरगुती रामबाण उपाय असून त्यामुळे आराम मिळू शकतो.
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण खुपच उपयोगी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायटिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते. यामुळे मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी. तसेच रक्तदाबावर शेवगा गुणकारी आहे. शेवग्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात. शेवग्याच्या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणाली सुधारते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
तसेच एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अॅसिड आहे. हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग केल्यास कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. तसेच एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शरीराला अँटीऑक्सीडेंट मिळतात तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहतो. शिवाय, दररोज आवळ्याचे सेवन केल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि कॉलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते. मुळा ही एक साधारण भाजी आहे. मुळा खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. मुळ्याची भाजी करून किंवा कच्चा खाल्ल्यास शरीराला मिनरल्स आणि योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळते.