आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ए, बी, एबी आणि ओ अशा चार प्रकारचे ब्लड ग्रुप असतात. नव्या संशोधनानुसार ब्लड ग्रुपवरून आरोग्याची अनेक महत्वपूर्ण माहिती मिळू शकते. तसेच ठराविक ब्लड ग्रुपच्या लोकांना काही ठराविक आजार होण्याची शक्यता जास्त असते. ब्लड ग्रुपनुसार कोणते आजार होण्याची शक्यता असते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ब्लड ग्रुप ए
या लोकांची प्रजननक्षमता चांगली असते. यांना दारू पिण्याची सवय असते. तसेच पोटाचा कँसर होण्याची शक्यता अधिक असते. या महिलांची गर्भधारणेची क्षमता जास्त असते.
ब्लड ग्रुप बी
चयापयच क्रिया चांगली असते, यामुळे त्यांना अल्सर होण्याची शक्यता जास्त असते. वृद्धापकाळी अल्जायमर, मेमरी लॉस असे आजार होऊ शकतात.
ब्लड ग्रुप ओ
ह्रदयरोग किंवा पोटाचा कँसर होण्याची शक्यता अजिबात नसते. मात्र बॅक्टेरियाचा यांचा शरीरावर लवकर परिणाम होतो. पोटाचा अल्सर होण्याची शक्यता जास्त असते. महिलांना गर्भधारणेस अडचण येण्याची शक्यता असते. तणाव सहन करण्याची क्षमता अद्भूत असते.
ब्लड ग्रुप एबी
ह्रदयरोग होण्याचा अधिक धोका असतो. चयापचय समस्या, हाय बीपीचा धोका असतो. डोळ्यांचे आजार शक्यतो होत नाही.