आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रक्तदान (Blood Donation) हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे केल्याने अनेक गरजू रूग्णांचे प्राण वाचू शकतात. गरजूंना जीवनदान देणारे रक्तदान हे रक्तदात्याच्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. रक्तदान (Blood Donation) केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात, याविषयी माहिती घेवूयात.
कँसर
रक्तात आयर्नचे प्रमाण नियंत्रित राहिल्याने नवीन पेशी तयार होतात. यामुळे कँसर होण्याची शक्यता कमी होते.
रक्ताभिसरण
नियमित रक्तदान केल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. शरीरात ऑक्सिजनचा पुरवठादेखील चांगला होतो.
हार्ट अटॅकपासून बचाव
रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने आटरीजमध्ये ब्लॉकेज आणि क्लॉटिंगची समस्या होत नाही. यामुळे हार्ट अटॅकपासून बचाव होऊ शकतो.
नवीन रक्तपेशी
रक्तदान केल्यानंतर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नवीन रक्तपेशी तयार होण्यास सुरूवात होते. हे आरोग्यासाठी चांगले आहे.
निरोगी हृदय
शरीरात जास्त आयर्न जमा झाल्याने हृदय आणि लिव्हर डॅमेज होण्याची भिती असते. नियमित रक्तदान केल्याने ही भिती कमी होते.
आयर्न पातळी
नियमित रक्तदान केल्याने रक्तातील आयर्नची पातळी नियंत्रित राहते. हीमोक्रोमाटोसिस हा आजार होण्याची शक्तता कमी होते.
High Blood Pressure | ‘या’ 7 लक्षणांमुळं ब्लड प्रेशर खुप हाय असल्याचं समजतं, एक्सपर्टने दिला इशारा
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर