आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तंबाखू-गुटखा, धूम्रपान, मद्यप्राशन या सवयींमुळे पुरुषांमध्ये अनेक आजार वाढत चालले आहेत. यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो. केमिकल, ग्रीस, पेंट, रबर, टेक्स्टाईल, लेदर इत्यादी गोष्टींशी संबंधित काम करणारांना यूरिनरी ब्लॅडर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. हा कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त प्रमाणात होतो. याची लक्षणे जाणून घेवूयात.
लघवीमधून रक्त पडणे
ही समस्या ब्लॅडरमधील कॅन्सरचे सामान्य लक्षण आहे. यामध्ये खूप वेदना होतात. अंडरवेअरमध्ये किंवा युरीनमध्ये लाल रंगाचे डाग दिल्यास डॉक्टरांकडे ताबडतोब जा.
लघवीला जळजळ
प्रत्येक वेळी लघवीला जळजळ आणि खूप त्रास होत असल्यास हे ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण असू शकते.
व्हाईट टिशु
लघवी करताना त्यामधून व्हाईट टिशू डिस्चार्ज होत असेल तर हा ब्लॅडर कॅन्सरचा संकेत असू शकतो.
वजन कमी होणे
वजन हळू-हळू कमी होत असल्याचे जाणवत असल्यास हा ब्लॅडरमधील कॅन्सरचा संकेत असू शकतो.
पाठीत त्रास
पाठीच्या खालील भागात त्रास होणे विशेषतः किडनीच्या ठिकाणी खूप वेदना होणे. ब्लॅडर किडनीशी एक नसेच्या माध्यमातून जुळलेले असते.
पायांवर सूज
हे लक्षण किडनीच्या आजराचा संकेत असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नये त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
वारंवार लघवी
लघवी आली नसेल तरीही वारंवार लघवी आल्याचे जाणवणे हेसुद्धा ब्लॅडर कॅन्सरचे एक लक्षण आहे. लघवी मंद गतीने होणे हासुद्धा ब्लॅडर कॅन्सरचा संकेत आहे.