आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेली जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा यामुळे डिप्रेशनसारखी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कमी होत चाललेला संपर्क, मित्र, कुटुंब यांच्याशी कमी झालेला संवाद यामुळे ही समस्या आणखी वाढत जाते. डिप्रेशनची समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय करावे, याविषयी माहिती घेवूयात.
ही काळजी घ्या
* नेहमी पॉझिटीव्ह अॅटिट्यूड ठेवा.
* आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते, हे सत्य स्वीकारले पाहिजे.
* मेडिटेशन, योगा नियमित करा.
* रोज व्यायाम करा. निरोगी शरीर तणावाचा सामना करू शकते.
* निरोगी आणि योग्य आहार घ्या.
* वेळेला इफेक्टिव्हली यूज करा.
* छंद, आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्या.
* आराम करा, पुरेशी झोप घ्या.
* अल्कोहोल, ड्रग्ससारख्या व्यसनांनी तणाव आणखी वाढतो.
* सामाजिक बना. लोकांसोबत वेळ घालवा.
* मानसिक तज्ञ किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घ्या.