आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण फास्ट फूडचे शौकीन झाले आहेत. मात्र फास्ट फूड जितक्या चवीने खाल्ले जातात तितकेच ते आरोग्यास हानीकारक आहेत . या पदार्थांच्या सेवनाने केवळ वजन वाढत नाही तर त्याचे शरीरावरही अन्यही दुष्परिणाम होतात. जाणून घ्या फास्ट फूडमुळे शरीराचे होणारे नुकसान –
त्वचेवर परिणाम
नेहमी फास्ट फूड खाल्ल्याने त्याचा त्वचेवर परिणाम होतो. फास्ट फूडच्या सेवनाने शरीराचा हार्मोनल बॅलन्स बिघडतो. त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडतात , पिंपल्स येतात.
झोप न येणे –
फास्ट फूड खाल्ल्याने मेंदूच्या न्यूरोकेमिकल प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे अनिद्रा , चिडचिड यांसारख्या समस्या निर्माण होतात.
डायबेटिज –
फास्ट फूडमध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चयपचनाची प्रक्रियेवर परिणाम होऊन शरीरातील इन्सुलिनचे कार्य बिघडते. त्यामुळे डायबेटिज होण्याचा धोका निर्माण होतो.
पचनाचे विकार –
फास्ट फूडमध्ये बहुतांशी तळलेले पदार्थ असतात. त्यासाठी वापरले जाणारे तेल व मसाल्याचे पदार्थ यांमुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते.
केसांच्या समस्या –
फास्ट फूडमुळे आवश्यक पोषकद्रव्य मिळत नाहीत. याचा सर्वाधिक परिणाम केसांवर होतो. पोषकद्रव्ये न मिळाल्याने केस रुक्ष -निस्तेज होऊन गळतात.