६ महिन्यांपासून ते १४ वर्षापर्यंत मुलांच्या दातांची ‘कशी’ काळजी घ्यावी , जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन – जर तुम्ही तुमच्या दातांची काळजी घेतली तरच ते तुम्हाला आयुष्यभर साथ देतील. दात मजबूत राहणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी गरजेचे आहे लहानपणापासूनच बाळांच्या दातांची काळजी घेणे. ज्यामुळे पुढे मुलांना दातांच्या कोणत्याच समस्येचा सामना करावा लागत नाही. बाळांचे ३ महिन्यानंतर दात येण्यास सुरुवात होते. ६ वर्षाचे झाल्यानंतर लहान मुलांना २० दात येतात. काही मुलांना दात लवकर येतात तर काही मुलांना लहानपणापासूनच खराब दात येण्यास सुरुवात होते. आपल्या मुलांच्या पालन पोषणामध्ये दातांची काळजी खूप महत्वाची आहे.
नवजात बालकांमध्ये जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्यांच्या हिरड्यांना वारंवार साफ करा. लहान बाळ झोपल्यानंतर त्यांना दुधाच्या बाटलीऐवजी पाणी द्या. दूधामध्ये साखर असल्यामुळे प्लाक होण्याची शक्यता वाढते.
पहिले दात आल्यानंतर
बाळांचे पहिले दात येताच तुम्ही बाळाचे दात ब्रशने साफ करु शकता पण त्यासाठी नेहमी मऊ ब्रशचा वापर करा.
४-६ दात आल्यानंतर
तुमची मुले जेव्हा ब्रश करत असतील तेव्हा त्यांच्याकडे लक्ष ठेवा.
मुलांना चॉकलेटपासून दूर ठेवा
लहान मुलांना चॉकलेटपासून दूर ठेवा पण तुम्ही प्रयत्न करा की तुमचा मुलगा कमीतकमी गोड पदार्थ खाईल. लहान मुलांना आहारामध्ये हेल्दी जेवण द्या.
चांगल्या सवयी
जेव्हा तुमची मुले स्कूलला जाणे सुरु करेल तेव्हा त्याला गोड खाल्यानंतर पाणी पिण्याची सवय लावा आणि त्यानंतर घरी आल्यानंतर ब्रश करण्यास सांगा.
Comments are closed.