पावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुंदर चेहऱ्याबरोबरच सुंदर आणि गुलाबी ओठांची जर त्यात भर असेल तर सुंदरतेवर अजूनच जास्त भर पडेल असे म्हणता येईल. आणि सुंदर ओठ सगळ्यांनाच अवश्यक असते. शरीराच्या सुंदरतेसाठी आपण अनेक उपाय करत असतो, आणि आपल्या खाण्या पिण्याकडे आपण लक्ष देत असतो. अगदी त्याच पद्धतीने ओठांच्या आरोग्यासाठीही लक्ष देणे फार गरजेचे आहे.

अशाच या ओठांचे पावसाळ्यात कशा पद्धतीने काळजी घ्यावी याचे काही उपाय ;

ओठांवर जर डेड स्किन झाली असेल आणि त्याची पापडी आपण हाताने काढत असाल तर यामुळे ओठांना इजा होण्याची शक्यता असते. तर अशा ओठांवरुन डेड स्किन काढायची असेल तर अर्ध्या चमच्या मधात एक चमचा साखर मिसळून त्याने ओठांना स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाते आणि ओठही सॉफ्ट होतात.

रात्री झोपण्याच्या आधी ओठांवर लीप बाम किंवा बोरोपल्स लावावा याचा खूप चांगला फायदा होतो. याशिवाय रोज रात्री ओठांना गायीचे तूप लावल्यानेही ओठ मुलायम आणि गुलाबी होतात.

ओठांना स्क्रब करण्याबरोबरच मसाजही करावा. खोबरे तेल किंवा बदाम तेलाने ओठांचा मसाज केल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

रात्री झोपताना जेव्हा मेकअप पुसतो तेव्हा ओठांवरचा लिपस्टीकही पुसून टाकावा आणि त्यानंतर लीप बाम लावावा. यामुळे ओठ नेहमी मुलायम राहतात.

याचबरोबर धूम्रपानापासून दूर रहावे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर ओठ ड्राय होतात. यामुळे सतत पाणी प्यावे.