आरोग्यासाठी झोपण्याची स्थितीही ठरते महत्वाची

sleeping
पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – झोप आयुष्यातील खूपच महत्त्वाचा भाग आहे. आपण किती तास झोपतो तसेच कसं झोपता हे खूप महत्त्वाचं ठरते. झोपण्याच्या स्थितीही झोपेवर परिणामकारक ठरत असते. त्यामुळे झोपण्याची स्थिती ही खूपच महत्वाची ठरते. झोपण्याच्या वेगवेगळ्या स्थितीचे विविध फायदे असले तरी प्रत्येकाची झोपण्याची पद्धत मात्र वेगळी असते. शरीराच्या गरजेनुसार झोपेची स्थिती असते.

गर्भात बाळ ज्या स्थितीत असतं, त्या स्थितीप्रमाणे म्हणजे एका बाजूवर झोपून कमरेत थोडं वाकून गुडघे छातीजवळ घेऊन झोपण्याची सवय अनेकांना असते. याचे खूप फायदे असतात. यामुळे घोरणंही कमी होतं. अशा स्थितीत झोपताना शरीर सैल असणं गरजेचं आहे, त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा होणार नाही. तसेच झोपताना गुडघ्यांच्यामध्ये उशी घेता येईल. एका कुशीवर झोपणे विशेषत डाव्या बाजूवर झोपणं खूप फायदेशीर आहे. यामुळे घोरण्याची समस्या कमी होते. पचनसंबंधी समस्या आणि छातीत जळजळ होत असल्यासही कमी होते. अति फॅटयुक्त खाल्ल्यानंतर उजव्या बाजूला झोपल्यानं हृदयात जळजळ आणि खाल्लेलं अन्न वर येण्याची समस्या वाढते. डाव्या बाजूला झोपल्यानं ही समस्या उद्भवत नाही. डाव्या बाजूला झोपल्यानं एका खांदा आखडतो. तसंच जबडाही घट्ट होता.

एका बाजूला झोपल्यानं रिंकल्सही येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. एका बाजूवर झोपताना पायांमध्ये उशी घेतल्यास कंबरदुखीची समस्या टाळता येते. उजवी किंवा डावी कुशी जी तुम्हाला आरामदायी वाटेल अशा बाजूवर झोपावे. मान आणि पाठदुखी टाळण्यासाठी योग्य उशी वापरली पाहिजे. बाजू बदलावीशी वाटल्यासही बदलू शकता. घोरण्याची समस्या आणि स्लिप अप्नियासाठी फायदा सोडता पोटावर झोपण्याच्या बाकी काही फायदे नाहीत. पोटावर झोपल्यानं मान आणि पाठदुखी उद्भवते. यामुळे स्नायू आणि सांध्यांवरही ताण येतो. तसंच डोक्याखाली जास्त उंचीची उशी घेऊ नये. उशी घेणं टाळले पाहिजे. जेणेकरून मानेवर ताण पडणार नाही.

पाठीवर झोपल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे पाठीचा कणा चांगला राहतो. तसेच हिप आणि गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. अशा स्थितीत झोपल्यानं गुरुत्वाकर्षणामुळे शरीर स्थिर राहतं. पाठीचा कणा किंवा इतर सांध्यांवर ताण येत नाही. चेहऱ्यावर रिंकल्स येत नाहीत. पाठदुखी, घोरण्याची समस्या किंवा स्लिप अप्निया असलेल्यांना पाठीवर झोपणं शक्य होत नाही. अशा स्थितीत झोपताना गुडघ्याखाली उशी घ्या, जेणेकरून पाठदुखी कमी होईल. डोक्याखाली उशी घेतल्यास सहज श्वासोच्छवास करता येईल. रोजच्या झोपण्याच्या स्थितीमुळे काही समस्या उद्भवत नसतील तर झोपेची स्थिती बदलण्याची गरज नाही. तुम्हाला जसं झोपणं आरामदायी वाटतं आणि आवडतं तसंच झोपलं पाहिजे.